Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: पालघर ग्रामीण रुग्णालयात शिकाऊ डॉक्टराला कोरोना संसर्ग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/corona-vaccine.jpg)
पालघर ग्रामीण रुग्णालयात शिकाऊ (इंटर्न) डॉक्टरला करोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर पालघरमधील इंटर्नशिप संपवून हा इंटर्न डॉक्टर मुंबईतील जोगेश्वरी येथे राहण्यास गेला होता. मात्र, पालघर येथील आपल्या वास्तव्यादरम्यान निर्माण झालेल्या मैत्रीसंबंध टिकवण्यासाठी हा डॉक्टर पालघर येथे टाळेबंदीच्या काळात येऊन गेल्याची माहिती पुढे आली आहे.