Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: देशातील ६२ जिल्ह्यात ८० टक्के रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-24-5.gif)
देशातील २७४ जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये करोनाची लक्षण दिसून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. लक्षणीय बाब म्हणजे देशातील एकूण जिल्ह्यांपैकी ६२ जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याचं समोर आलं आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे या ६२ जिल्ह्यांमधील आहे. त्यामुळे १४ देशभरात लॉकडाउन हटवण्यात आला, तरी या ६२ जिल्ह्यामध्ये कायम राहण्याची चिन्हे आहेत. यात महाराष्ट्रातीलही काही जिल्ह्यांचा समावेश आहे.