breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: …तर कामगार कपातीसारखीच ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल- खासदार संजय राऊत

करोनाच्या संकटामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांवर मंत्रीकपात करण्याची वेळ येईल असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता केलं आहे. सामनाच्या रोखठोक या सदरात त्यांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली आहे. संजय राऊत म्हणतात, “महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात करोना लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडही पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी सध्याची अवस्था आहे. जे मलाईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल.”

नेमकं काय म्हणाले आहेत संजय राऊत?
महाराष्ट्रात बेरोजगारी वाढणे हे देशाला परवडणारे नाही असे मी एका वरिष्ठ अधिकाऱ्यास सांगितले. तेव्हा त्या अधिकाऱ्याने एक मिश्किल भाष्य केले. मंत्रालयातही अनेकांच्या हाताला काम नाही तिथे इतरांचे काय घेऊन बसलात? करोनामुळे आय.ए.एस. आयपीएस अधिकाऱ्यांचा एक मोठा गट कामाच्या प्रतीक्षेत उभा आहे. त्यांना काम हवे आहे व तो त्यांचा हक्क आहे. महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्ह्यात करोना लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडही पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी सध्याची अवस्था आहे. जे मलाईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. हे असेच सुरु राहिले तर कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करण्याची वेळ येईल”

आणखी काय म्हणाले आहेत संजय राऊत?

  • करोना काळात राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे.
  • लोकांना विरोधकांना घरी बसवले व संकटकाळात ते सरकारविरोधी काम करत आहेत
  • मुख्यमंत्री टाळेबंदीच्याबाबतीत कठोर आहेत. करोनाचे संक्रमण वाढू नये ही त्यांची भूमिका आहे तर शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेते निर्बंध शिथी व्हावेत लोकांनी हळूहळू स्वतःची सुरक्षा सांभाळून कामधंद्यास लागावे या मताचे आहेत
  • करोनाच्या पेचा जनता अधूनमधून अस्वस्थ मनाचा उद्रेक घडवत आहे.
  • करोना संकटाने जगाचे संदर्भ बदलत चालले आहेत. जगात किमान २७ कोटी लोक अत्यंत गरीब होतील. त्यातले ६ कोटी लोक भारतात असतील.
  • राम मंदिर, हिंदुस्थान पाकिस्तान, मुसलमान हे विषय मागे टाकून रोजगार व भूक या विषयांर जे बोलतील तेच लोकांचे पुढारी होतील
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button