breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १६१ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १६१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २ हजार ७०९ इतकी झाली असून, मृतांचा आकडा ८० इतका झाला आहे. नवी मुंबई आणि ठाणे शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढतच असताना आता उल्हासनगर शहरातही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे बुधवारच्या आकडेवारीतून समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यात मंगळवारी १७१ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. त्यानंतर बुधवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये १६१ नवे रुग्ण आढळले. त्यात ठाणे शहरातील ४७, कल्याण-डोंबिवली शहरातील २०, भिवंडी शहरातील ४, अंबरनाथ शहरातील १, उल्हासनगर शहरातील १८, बदलापूर शहरातील ६, मीरा-भाईंदर शहरातील ३, नवी मुंबई शहरातील ५४ आणि ठाणे ग्रामीणमधील ८ रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button