breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: जलद चाचणी फक्त पाच मिनिटांत
राज्यात सध्या करोनाच्या पाच हजार चाचणींची क्षमता आहे. त्यासह केंद्र सरकारने आता जलद चाचणीची (रॅपिड टेस्ट) मान्यता दिली असून त्यामुळे करोनाची प्राथमिक चाचणी केवळ पाच मिनिटांत करून करोना आहे की नाही हे स्पष्ट होईल.
’त्यामुळे महाराष्ट्रात आता मोठय़ा प्रमाणात या जलद चाचणी करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना चाचण्यांची संख्या तुलनेत मर्यादित होती.
’राज्यात पाच हजार चाचण्यांची क्षमता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत करोनाच्या जलद चाचणीला (रॅपिड टेस्ट) मान्यता देण्यात आली आहे.