breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: कोरोना रुग्णांच्या मृत्यूने आज गाठला 300चा आकडा, एका दिवसांत सर्वाधिक मृत्यूची नोंद

मुंबई: राज्यात आज दिवसभरात तब्बल 300 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. एका दिवसांमध्ये झालेली ही सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. तर आज राज्यात 10 हजार 300 नवे रुग्ण आढळून आलेत तर आज 10 हजार 900 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 4 लाख 90 हजार 262 एवढी झालेली आहे. 1 लाख 45 हजार 582 रुग्ण Active आहेत. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 66.67 वर गेलेलं आहे.

दरम्यान, आता मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण हे वाढलं असून ते तब्बल 87 दिवसांवर गेलं आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. 10 जूनला हा रेट फक्त 25 एवढाच होता. मात्र महापालिका आणि राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे हा कालावधी वाढल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button