breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला ‘हा’मोठा निर्णय
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढताना दिसत नाही. मात्र, त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन केले जात असतानाच राज्यातील विविध अस्थापनेवर होणारा खर्चही नियंत्रणात आणला जात आहे.
मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार यांच्यासह सर्व निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या पगारामध्ये मार्च महिन्यात 60% कपात करण्याचे आदेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
तसेच, ग्रेड ए आणि बी अधिकाऱ्यांचे पगार 50% आणि ग्रेड सीच्या कर्मचार्यांचे 25% कपात केले जातील. विशेष म्हणजे, ग्रेड-डी कर्मचार्यांच्या पगारामध्ये कोणतीही कपात केली नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.