#CoronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात आता दशक्रियेला सुद्धा आॅनलाईन उपस्थितीस सुरुवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG-20200519-WA0005.jpg)
कोरोना विषाणूमुळे सगळे जगात अस्थिरता निर्माण झालेली आहे. अशातच खेड्यात सोशल डिस्टन्सिंग, क्वारंन्टाईन हे इंग्रजी शब्द आता अडाणी माणसे सुद्धा सर्रास वापरु लागले आहेत. लाॅकडाऊनमुळे सुखदुःखात सामील होता येत नसल्याने लोक अस्वस्थ आहेत. यावर आॅनलाईन पद्धतीने कार्यक्रम करुन जखणगांवच्या डॉ सुनील गंधे यांनी नामी उपाय शोधला आहे.
मोबाईल मधील वेगवेगळ्या अॅप चा वापर करून त्यांनी गेल्या दोन महिन्यात अनेक सार्वजनिक कार्यक्रम आॅनलाईन पद्धतीने आयोजित करुन यशस्वी केले आहेत. कॉलेजमधील विद्यार्थी, ग्रामस्थ, वरहाडी, दुखा:किंत, संघटनेतील सहप्रार्थी अशा विविध क्षेत्रात त्यांनी झुम, स्काईप, काॅन्फरन्स काॅल,यु ट्युब,फेसबुक लाईव्ह,गो फाॅर मिटींग अशा वेगवेगळ्या अॅप मार्फत त्यांनी आतापर्यंत ग्रामसभा, साखरपुडा, लेक्चर, व्याख्यान, मुलाखती, प्रवचन यासारखे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केली व ती लोकसहभागातून यशस्वी करून दाखवीली.
खातगांव टाकळी ता नगर येथील माजी सरपंच श्री शामराव कुलट यांच्या वडिलांच्या निधनानंतर धार्मिक विधी करावा किंवा नाही या विवंचनेत कुलट परिवार असल्याचे डॉ सुनील गंधे यांच्या निदर्शनास आले व त्यांनी कै नामदेव (सुदाम) तुकाराम कुलट यांचा दशक्रिया विधी आॅनलाईन झुम अॅप वर प्रसारित करुन दशक्रियेसाठी आॅनलाईन लाईव्ह प्रवचन करुन एक अनोखा उपक्रम राबवला. जगातील पहिल्याच आॅनलाईन दशक्रिया विधीला समाजाने सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत खातगांव टाकळी येथील नविनच विकसीत केलेल्या स्मशान भुमीत मोजक्याच लोकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पण हजारो लोकांच्या आॅनलाईन उपस्थितीत हा काकस्पर्श विधी व प्रवचन सेवा पार पडली. विशेष म्हणजे अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली सुद्धा आॅनलाईन लाईव्ह वाहुन दु:खी परिवाराचे सुद्धा सांत्वन केले. या अनोख्या उपक्रमाची राज्यभर जोरदार चर्चा झाली.