breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: कोरोनाग्रस्त महिलेमुळे रुग्णालयाची तपासणी..
घाटकोपर येथील ८६ वर्षीय महिलेचा करोना संसर्गामुळे हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मुलुंडमधील स्पंदन रुग्णालयात या आधी ती दाखल असल्याने रुग्णालय १४ दिवसांसाठी क्वारंटाईन के ले आहे. रुग्णालयातील ६१ जणांच्या चाचण्या केल्या असून त्या नकारात्मक आल्या आहेत.
बालरोगतज्ज्ञाची बेफिकिरी.. नवीन पनवेल वसाहतीमधील एका बालरोगतज्ज्ञाने स्वत:च्या मुलीच्या परदेश प्रवासाची माहिती लपवून मागील १५ दिवसांत ४०० हून अधिक बालकांवर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे पनवेल पालिकेने संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयातील बाह्य़रुग्ण तपासणीची सेवा तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.