breaking-newsमहाराष्ट्र

#CoronaVirus:राज्य सरकारची केरळकडे प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सची मागणी

मुंबई : मुंबई, पुण्यातील कोरोना रुग्णांचा वाढती संख्या लक्षात घेता आपल्याला जास्ती जास्त प्रशिक्षित डॉक्टर्स आणि नर्सेसची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आता राज्य सरकारने केरळला प्रशिक्षण डॉक्टर आणि नर्स पुरवण्याची विनंती केली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ टी. पी. लहाने यांनी यासंदर्भात केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांना विनंती पत्र लिहलं आहे.

केरळने योग्य नियोजन करून कोरोना आटोक्यात आणला आहे. केरळ पॅटर्नची देशभर चर्चा सुरू आहे. या केरळ पॅटर्नमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेसना प्रशिक्षित करण्यात आलं होतं. यातीलच ५० प्रशिक्षित डॉक्टर आणि १०० नर्सेस केरळने मुंबईत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पाठवावेत, अशी विनंती या पत्रात लहानेंनी केली आहे.

मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स इथे ६०० बेडचे विशेष रुग्णालय उभारलं जातंय. इथे कोरोनाची गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. या रुग्णालयात १२५ आयसीयू बेड असणार आहेत. सध्या मुंबई महापालिका आणि राज्य सरकारचे डॉक्टर आणि नर्सेस दिवसरात्र रुग्णालयांमध्ये काम करत आहेत. तर काही खाजगी डॉक्टर आणि नर्सेसही राज्य सरकारबरोबर काम करायला तयार आहेत. तरीही राज्य सरकारला अजून कोरोनावर उपचार करणाऱ्या प्रशिक्षत डॉक्टरांची आणि नर्सेसची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने केरळकडे ही मागणी केली आहे.

केरळकडे ही विनंती करताना या डॉक्टरांना आणि नर्सेसना राज्य सरकार  वेतनही देणार आहे. एमबीबीएस डॉक्टरांना राज्य सरकार दरमहा ८० हजार, तर एमडी, एमस डॉक्टरांना दरमहा २ लाख रुपये आणि  प्रशिक्षित नर्सेसना दरमहा ३० हजार रुपये वेतन देणार आहे. त्यांच्या राहण्याची आणि जेवनाची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे. त्यांना पीपीई किट इतर औषध राज्य सरकार पुरवणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button