#CoronaVirus:चिंताजनक! राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ; बुधवारी ३२५४ रुग्णांची नोंद
बुधवारी पुन्हा एकदा राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी ३ हजार २५४ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील करोनाबाधितांची एकून संख्या ९४ हजार ०४१ इतकी झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर १४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, एक दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी १ हजार ८७९ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यानंतर आतापर्यंत उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्यांची संख्याही ४४ हजार ५१७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ४६ हजार ०४७ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ४४ हजार ५१७ जणांनी करोनावर मात केली आहे.
The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 94041 Today,newly 3254 patients have been identified as positive. Also newly 1879 patients have been cured today,totally 44517 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 46074.
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 10, 2020
दरम्यान, मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंतर मुंबईतील १ हजार ८५७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतही आतापर्यंत २३ हजार ६९४ जणांनी करोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या २७ हजार १०९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.