breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus:खबरदारीचा उपाय म्हणून बायोमॅट्रिक हजेरी बंद

अकोला | महाईन्यूज

कोरोना विषाणू संर्गास प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रीक हजेरीला मर्यादीत कालवधीसाठी स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांना हजेरीपटावर उपस्थिती दर्शवावी लागणार आहे.कोरोना विषाणू फैलावास प्रतिबंध करण्यासाठी बहुसंख्येने लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक जत्रा, यात्रा, तसेच अन्य धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक सर्व कार्यक्रम पुढील सूचना येईपर्यंत रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोरोनो विषाणूचा प्रसार शासकीय कार्यालयांमध्ये होउ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यालयांमधील बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी पूर्वीप्रमाणे हजेरीपटावर नोंदविण्यात येणार आहे. यासंदर्भात विभाग, कार्यालयांनी संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मार्च महिनाभर तरी अधिकारी, कर्मचारी हजेरीपटावर स्वाक्षऱ्या करताना दिसून येतील. यासंबंधीचा शासन निर्णयच शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button