breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#Coronapolitics: भाजपच्या ‘माझं अंगण रणांगण’ आंदोलनाला महाविकास आघाडीकडून ‘महाराष्ट्रद्रोही BJP’ ट्रेंडनं उत्तर

मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी

ABP Majha Marathi News

Adhttps://securepubads.g.doubleclick.net/gampad/ads?iu=2599136%2FMajha_ROS_Top_M&adk=2525320239&sz=300×250&output=html&impl=ifr&ifi=1&msz=360x-1&psz=360x-1&fws=4&adf=3883041901&nhd=0&adx=30&ady=110&oid=2&adsid=ChAI8PCd9gUQgrrggZnulNV5Ej0AkI3AO8n4p1XFG-AVwB9WZgfTpWfTlJd0eA5h-ovInMyrATrnRzUmLYTc752SjiZoWPOC0br5a2NQVruH&jar=2020-05-03-17&gdfp_req=1&sfv=1-0-23&u_sd=3&is_amp=3&amp_v=2005151844001&d_imp=1&c=31008292&ga_cid=amp-Nyndx3SURqLE1vTysdStJw&ga_hid=8292&dt=1590131592659&biw=360&bih=610&u_aw=360&u_ah=780&u_cd=32&u_w=360&u_h=780&u_tz=330&u_his=1&vis=1&scr_x=0&scr_y=0&bc=5&url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmaharashtra%2Fbjps-majha-angan-ranangan-agitation-maha-vikas-aghadi-answer-maharashtradrohi-bjp-trend-773094&loc=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmaharashtra%2Fbjps-majha-angan-ranangan-agitation-maha-vikas-aghadi-answer-maharashtradrohi-bjp-trend-773094%2Famp%3F__twitter_impression%3Dtrue&ref=https%3A%2F%2Ft.co%2FiBLVpWU33N%3Famp%3D1&bdt=1867&dtd=497&aet=n&__amp_source_origin=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com

भाजपच्या 'माझं अंगण रणांगण' आंदोलनाला महाविकास आघाडीकडून 'महाराष्ट्रद्रोही BJP' ट्रेंडनं उत्तर

भाजपच्या ‘माझं अंगण रणांगण’ आंदोलनाला महाविकास आघाडीकडून ‘महाराष्ट्रद्रोही BJP’ ट्रेंडनं उत्तर

भाजपनं (Maharashtra BJP) माझं अंगण रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ अंतर्गत राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केलं. तर भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाविकासआघाडीनं महाराष्ट्रद्रोही भाजप असं आंदोलन सुरु केलं आहे.

सध्या कोरोनाचं संकट राज्यात वाढत चालले आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचं संकट रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने राज्य सरकारविरोधात आंदोलन केले. ठाकरे सरकारविरोधात घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. ‘माझं अंगण रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ अंतर्गत हे निषेध आंदोलन करण्यात आलं. तर भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाविकासआघाडीनं महाराष्ट्रद्रोही भाजप असं आंदोलन सुरु केलं आहे. महाराष्ट्रद्रोही BJP हा ट्रेंड ट्विटरवर सुरु केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. कोरोनाला रोखण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे. संकट मोठं आहे म्हणून सहकार्य करा, असं सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं. त्यामुळे आम्ही आणि सामान्य जनतेनेही सहकार्य केलं. पण आता लोकांच्या मनातील राग अधिक काळ लपवून राहू शकत नाही, असं सांगतानाच ठाकरे सरकारचं अपयश आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यातील सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिले आहेत, असं पाटील यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, आज भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घराच्याबाहेर उभं राहून काळ्या फिती, काळे झेंडे, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवला गेला. दुसरीकडे महाविकास आघाडीनं भाजपविरोधात सोशल मीडियावर आंदोलन सुरु केलंय. महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धीराने सामोरे जात असताना भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button