ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

गणेश विसर्जनासाठी वाकड येथे पर्यावरण पूरक हौदाची निर्मिती

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांचा सामाजिक उपक्रम

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन करण्यासाठी वाकड येथील द्रौपदा लॉन्स येथे पर्यावरण पूरक हौदाची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी गणेश विसर्जन करण्यासाठी या हौदाचा उपयोग करावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केले आहे. गेल्या काही वर्षांपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे प्रमाण वाढले असून त्यामूळे जलप्रदूषणात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी गणेश भक्तांनी नदी, नाला, ओढ्यात, विहिरीत मूर्ती विसर्जन करून पर्यावरणास हानी पोहोचवू नये. या उद्देशाने हा विसर्जन हौद निर्माण केला आहे. याठिकाणी सर्व नागरिकांसाठी, घरगुती आणि गणेश मंडळांसाठी पाच फुटापर्यंतच्या गणेश मूर्तीचे विसर्जन तसेच मूर्तीदान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

सदर विसर्जन हौद दि.२० सप्टेंबर २०२३ पासून खुला करण्यात येत आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत येथे मूर्ती विसर्जन करता येईल. येथे येणाऱ्या सर्व गणेश भक्तांनी गुलाल किंवा अन्य रंगाचा वापर करू नये, निर्माल्य निर्माल्यकुंडातच टाकावे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये व पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा असेही आवाहन विशाल वाकडकर यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button