दहशतवाद्यांचा पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट, अतिरेक्यांना सिरियातून आदेश
![Conspiracy of terrorists to carry out serial bomb blast in Pune, order to terrorists from Syria](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Pune--780x470.jpg)
पुणे : पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात पुढं आली आहे. यासंदर्भात सूचना इसीस दहशतवाद्यांना सिरीयामधून दिल्या जात होत्या, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुणे इसिस मॉड्युल प्रकरणी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला नुकतीच अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट समोर आला. दहशतवाद्यांना साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सिरियामधून आदेश मिळत होते.
हेही वाचा – गायत्री इंग्लिश स्कूलचा दिवाळीनिमित्त ‘मूठभर धान्य’ उपक्रम
दहशतवादी कृत्यातून सामाजिक शांतता आणि धार्मिक सलोखा बिघडवणं, हे इसिसचं उद्दिष्ट आहे. इसिसकडून सातत्यानं भारतविरोधी मोहीम राबविली जाते. तसेच देशात हिंसाचार घडवून आणण्यासाठी विविध माध्यमांतून इसिसकडून आजवर प्रयत्न करण्यात आले आहेत. दहशतवाद्यांचे दहशत आणि हिंसाचार घडवण्याचा डाव उधळून लावण्यासाठी एनआयएकडून सखोल तपास करण्यात येत असल्याचं एनआयच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.