पुण्यातील निर्भया बनो सभेदरम्यान गोंधळ, पत्रकार निखिल वागळेंसह २०० जणांवर गुन्हे दाखल
पुणे | ‘निर्भय बनो सभे’साठी पुण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची गाडी भाजपा कार्यकर्त्यांनी फोडली. निखिल वागळे यांच्या गाडीवर शाईफेकही करण्यात आली. याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंसह किमान २०० जणांवर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पत्रकार निखिल वागळे यांच्यावरही गुन्ह्याची नोंद झाली आहे.
पहिला गुन्हा हा आंदोलनकर्ते आणि गाडी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे तर दुसरा गुन्हा आयोजक, निखिल वागळे, महायुती आणि महाविकास आघाडी या सगळ्या २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – टेडी डे का साजरा केला जातो? टेडी हे नाव कस पडलं? वाचा सविस्तर..
पुण्यातील राष्ट्र सेवा दलात निर्भया बनो या कार्यक्रमस्थळाजवळ जमावबंदीचा आदेश देण्यात आला होता. या आदेशाचं उल्लंघन करुन हे सगळे कार्यकर्ते सभास्थळी जमले होते. त्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाडीफोड केली, शाईफेक केली यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण केलं. तर महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते भाजपविरोधात आंदोलन करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी दोघेही आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. परिणामी मोठा गदारोळ झाला. पोलिसांच्या आदेशाचं आणि जमावबंदीचं उल्लंघन केल्याने या सगळ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.