TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रराष्ट्रिय
पत्रकार अमिन खान यांना मातृशोक
तळेगाव दाभाडे ः
आदर्श शिक्षिका दमयंती अफताब खान (वय 85 वर्षे) यांचे मंगळवार 31 जानेवारी रोजी रात्री 11.55 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. पत्रकार अमिन खान यांच्या त्या मातोश्री होत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दफनविधी वडगाव-मावळ येथील कब्रस्तान येथे बुधवार 1 फेब्रुवारी रोजी 11 वाजता होणार आहे.