राज्यात पुढील आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार
![Cold weather will increase in the state from next week](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/maharashtra-weather--780x470.jpg)
पुणे : देशभरात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. साधारण आठवडाभरपूर्वीपर्यंत नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते, पण आता राज्यातील अनेक भागांत तापमानात मोठी आणि वेगाने घसरण होत आहे. नागपूरसह पुणे, नाशिक, मुंबई या शहरांत थंडी जाणवू लागली आहे.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींना आता मराठ्यांची गरज नाही का? मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल
#Deccan plateau cools down! Some minimum temperatures recorded in #Maharashtra on 27/10/2023 in °C:#Savedi(#Nagar) & #Kenjal (#Satara): 12#Gavase(#Kolhapur): 12.5#Pashan(#Pune): 12.8#Donja (#Osmanabad): 13.1#Pandurli (#Nashik): 13.5#Garaj (#Ch.Sambhajinagar): 13.7#Winter
— Vagaries of the Weather (@VagariesWeather) October 27, 2023
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नागपूर या शहरांमध्ये रात्रीच्या तापमानात घसरण सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत उत्तर भारतातील थंड भागातून ईशान्येचे वारे येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी तापमानात घट होईल. साधारणपणे पुढील आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार आहे.