breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पवळे क्रीडांगण क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करा अन्यथा.. मनसेचा इशारा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील प्रभाग क्र. १३ परिसरातील निगडी यमुनानगर मधील कै. मधुकर पवळे क्रीडांगण हे गेली अनेक दिवस फ प्रभाग स्थापत्य यांच्या ताब्यात आहे, त्यामुळे या क्रीडांगणाचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे. हे क्रीडांगण लवकर क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करण्यात यांवी अशी मागणी महाराष्ट्रनवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.

या क्रीडांगणामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे, काही ठिकाणी मोडतोड झाली आहे . सुरक्षारक्षक नाहीत , त्याप्रमाणे भटकी जनावरे व कुत्रे यांचा वावर जास्त होत आहे. त्यामुळे अनेक क्रीडाप्रेमी नाराज झालेले आहेत. तरी मी आपणास नम्र विनंती करतो की, कै. मधुकर पवळे क्रीडांगणाचा विकास होण्यासाठी सदर क्रीडांगण हे लवकरात लवकर क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करावे . अन्यथा जनआदोलन घेतले जाईल असा इशारा मनसे शहरअध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button