‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ११\१२ आमदार घेऊन IPL टीम बनवावी’, निलेश राणेंकडून जहरी टीका
!['उद्धव ठाकरेंनी १११२ आमदार घेऊन IPL टीम बनवावी', निलेश राणेंकडून जहरी टीका](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/उद्धव-ठाकरेंनी-१११२-आमदार-घेऊन-IPL-टीम-बनवावी-निलेश-राणेंकडून.jpg)
रत्नागिरी : शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असल्याने राज्याच्या राजकरणाला मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे स्वपक्षातूनच अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप युवानेते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे यांच्यावर टिका करण्याची संधी सोडलेली नाही.
पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. मातोश्री ११ IPL टीम बनवा, असे ट्विट त्यांनी केले आहे. निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “शिवसेनेचे ११/१२ आमदार शिवसेनेसोबत राहतील अशी परिस्थिती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे ११/१२ घेऊन IPL team साठी तयारी करा. मातोश्री ११ बनवा.” सध्या स्वपक्षांतील बंडखोरीमुळे अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा जोरदार टोला मानला जात आहे.
जवळपास ७५ टक्के आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना हा टोला जोरदार लागणारा आहे. दरम्यान, शिवसेनेचे बरेचसे आमदार मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असल्यानेच संजय राऊत यांनी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असे ट्विट करून बहुतांश आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत नसल्याचेच सुचक विधान केले आहे. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर हँडलवरून मंत्री पदाचा उल्लेखही हटवला आहे.