“मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोपांची…”; विरोधकांना प्रत्युत्तर देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या भाषणावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
!["Chief Minister of all allegations…"; Aditya Thackeray's first reaction to Uddhav Thackeray's speech in reply to the opposition](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Assembly-session-uddhav-thackeray-aditya-thackeray.jpeg)
मुंबई |
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत घडलेल्या प्रकारावरुनही भाजपाला घेरले. त्यांच्या आजच्या भाषणावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अधिवेशन संपल्यानंतर सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आजचा मुख्यमंत्र्यांच्या भाषण प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, देशातली परिस्थिती काय आहे, अघोषित आणीबाणी कशी आहे, या सगळ्यावर ते परखडपणे बोललेले आहेत. जे काही महाराष्ट्रात किंवा जिथे भाजपाची सत्ता नाही तिथे घाबरवणं, धमकावणं, केंद्रीय यंत्रणा वापरणं हे मुख्यमंत्र्यांनी ज्या शब्दांमध्ये परखडपणे मत मांडलेलं आहे. महाराष्ट्र झुकणार नाही, आम्ही लढा देत राहू, सत्याच्या सोबत राहू. विरोधकांच्या आरोपांवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “त्यांना सकाळी उठल्याबरोबर आरोप करण्याची सवयच आहे पण जनता त्याच्याकडे लक्ष देत नाही. जनता आमच्यासोबत आहे. विरोधकांच्या सर्व आरोपांची आज मुख्यमंत्र्यांनी चिरफाड केली आहे.