breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

गणेशोत्सवाकरीता मध्य रेल्वे चालविणार १५६ गणपती स्पेशल ट्रेन!

मुंबई : मध्ये रेल्वेकडून गणेशोत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी १५६ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यात या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, पनवेल आणि पुणे या स्थानकातून या विशेष एक्सप्रेस चालवण्यात येणार आहेत.

मुंबई-सावंतवाडी रोड स्पेशल (४० सेवा)

०११७१ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १३-०९-२०२३ ते २-१०-२०२३ (२० ट्रिप) पर्यंत दररोज मध्यरात्री १२.२० वाजता (००.२०) वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 14.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. ०११७२ स्पेशल सावंतवाडी रोडवरून 13.09.2023 ते २-१०-२०२३ (२० ट्रिप) दररोज दुपारी १५.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाडीचे थांबे: दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

एक्स्प्रेसमधीस कोच रचना: १८ स्लीपर क्लास, एका गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.

हेही वाचा – चिकन खाणाऱ्यांसाठी WHOचा सतर्कतेचा इशारा! ‘या’ आजाराला पडाल बळी

लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (२४ सेवा)

०११६७ स्पेशल एलटीटी वरून १३, १४, १९, २०, २१, २४, २५, २६, २७, २८ सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये १.१० ,२-१०-२०२३ (१२ ट्रिप) रोजी रात्री २२.१५ वाजता सुटेल आणि आणि कुडाळला दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पोहोचेल ०११६८ स्पेशल कुडाळ येथून १४, १५, २०, २१, २२, २५, २६, २७, २८, २९ आणि २ आणि ३ ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजता सुटेल. (१२ ट्रिप) त्याच दिवशी रात्री २१.५५ वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीचे थांबे: ठाणे, पनवेल, रोहा. माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

एक्स्प्रेसमधीस कोच रचना: एक टू टिअर वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, २ गार्डच्या ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी.

पुणे-करमाळी/कुडाळ-पुणे विशेष (६ सेवा)

०११६९ विशेष गाडी १५-०९-२०२३, २२-०९-२०२३ आणि २०-०९-२०२३ रोजी पुण्याहून सायंकाळी १८.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता कुडाळला पोहोचेल. ०११७० स्पेशल कुडाळहून १७-०९-२०२३, २४-०९-२०२३ आणि १-१०-२०२३ रोजी सायंकाळी १६.०५ वाजता सुटेल आणि पुण्याहून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता पोहोचेल. थांबे: लोणावळा, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

संरचना : एक टू टिअर वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ जनरल सेकंड क्लाससह २ गार्ड्स ब्रेक व्हॅन.

करमाळी-पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक) ६ सेवा

०११८७ स्पेशल १६-०९-२०२३, २३-०९-२०२३ आणि ३०-०९-२०२३ (३ ट्रिप) रोजी करमाळी येथून दुपारी १४.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २.४५ वाजता पनवेलला पोहोचेल. ०११८८ स्पेशल पनवेलहून १७-०९-२०२३, २४-०९-२०२३ आणि १-१०-२०२३ (३ ट्रिप) रोजी पहाटे ५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४.०० वाजता कुडाळला पोहोचेल. थांबे: थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, काकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, रोहा आणि माणगाव.

संरचना : एक टिअर वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान क्लास, २ गार्डच्या ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

दिवा – रत्नागिरी मेमू स्पेशल (४० सेवा)

०११५३ स्पेशल दिवा येथून १३-०९-२०२३ ते २-१०-२०२३ (२० ट्रिप) दरम्यान ७.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.55 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. 01154 विशेष गाडी १३-०९-२०२३ ते २-१०-२०२३ (२० ट्रिप) दरम्यान १५.४० वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी २२.४० वाजता दिवा येथे पोहोचेल. थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

संरचना : १२ कार मेमू रेक

मुंबई – मडगाव विशेष साप्ताहिक ४० सेवा

०११५१ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १३-०९-२०२३ ते २-१०-२०२३ (२० ट्रिप) पर्यंत दररोज ११.५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी २.१० वाजता मडगावला पोहोचेल. ०११५२ स्पेशल मडगावहून १३-०९-२०२३ ते २-१०-२०२३ (२० ट्रिप) दररोज ३.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १७.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल. थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

संरचना : १८ शयनयान क्लास, एका गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button