ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक, कधी, कुठे, केव्हा ?

कर्जत-खोपोली लोकल सेवा रद्द

मुंबई : रोजची कामं, ऑफीस, शाळा, कॉलेजची घाई. लाखो मुंबईकरांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारी, अव्याहतपणे सुरू असलेली,मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल.. सतत सुरू असणारी ही रेल्वेसुद्धा कधीतरी थांबते. दुरूस्तीच्या कामासाठी रेल्वे लाईनवर वेळोवेळी ब्रेक्स, ब्लॉक्स घेतले जातात, पण बहुतांश वेळेसे ते कमी गर्दीच्या दिवशी, वीकेंडला, शनिवार-रविवारी घेतले जातात. पण याच मुंबईकरांसाठी आता एक महत्वाची अपडेड आहे.

कारण मध्य रेल्वे मार्गावर आत ब्लॉक घेतला जाणार असून तो शनिवार-रविवारी नव्हे तर आठवड्याच्या मध्येच घेतला जाणार आहे. त्यामुळे या आठवड्यात कामासाठी घराबाहेर पडायच्या आधीच, ही बातमी नीट वाचून, समजून घ्या आणि तसे नियोजन करून मगच बाहेर पडा.

मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक,कधी , कुठे, केव्हा ?

कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी 26.09.2025 (शुक्रवार) ते 10.10.025 (शुक्रवार) दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स घेतला आहे. यामुळे येत्या 1 ऑक्टोबर(बुधवार) ते 2 ऑक्टोबर (गुरूवार) दरम्यानही काही ब्लॉक्स घेतले जाणार असून त्याचा रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स परिचालीत करणार आहे.

1.10.2025 (बुधवार) ते 2.10.2025 (गुरुवार) दरम्यानच्या ब्लॉकची माहिती व गाड्यांच्या वाहतुकीवरील परिणाम पुढीलप्रमाणे आहे :

ब्लॉकची तारीख व वेळ :

*1.10.2025 (बुधवार) – सकाळी 11.20 ते सायं 17.20 (संध्याकाळी 5) वाजेपर्यंत * 02.10.2025 ५ (गुरुवार) – सकाळी 11.00 ते दुपारी 15.30 (दुपारी 3) वाजेपर्यंत

ट्रॅफिक ब्लॉक विभाग :

भिवपुरी स्थानक– जांब्रुंग केबिन –ठाकूरवाडी– नागनाथ केबिन ते कर्जत दरम्यान

ब्लॉक कालावधीत उपनगरी गाड्यांचे नियोजन :

कर्जत व खोपोली दरम्यान अप आणि डाउन उपनगरी सेवा ब्लॉक कालावधीत उपलब्ध राहणार नाहीत.

1.10.2025 (बुधवार)

गाड्यांच्या वाहतुकीवरील परिणाम:

डाउन उपनगरी गाड्यांचे रद्दीकरण :

– कर्जत येथून 12.00, 13.15 आणि 15.39 वाजता सुटणाऱ्या कर्जत-खोपोली लोकल रद्द करण्यात येतील.

अप उपनगरी गाड्यांचे रद्दीकरण :

– खोपोली येथून 11.20, 12.40 आणि 14.55 वाजता सुटणाऱ्या खोपोली- कर्जत लोकल रद्द करण्यात येतील.

उपनगरी गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 09.01, 09.30, 09.57 , 11.14 आणि 13.40 वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत उपनगरी गाड्या नेरळ येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button