पुण्यात बिल्डरची गुंडगिरी, शेतकऱ्यावर बंदुक उगारली, व्हिडीओ व्हायरल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Pune-Farmer-780x470.jpg)
पुणे | पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याचदरम्यान, आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवसाढवळ्या एका बिल्डरने एका शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे. हा सर्व प्रकार त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये घडला असून त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. शहरातील विश्रांतवाडीतील हा धक्कादायक प्रकार आहे.
हेही वाचा – सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांच्याकडून विधानसभेचे रणशिंग!
नेमकं प्रकरण काय?
रांजणगाव येथील एका शेतकऱ्याची जमीन प्रभाकर भोसले यांनी विकत घेतली होती. घरासाठी पैसे देतो म्हणून भोसलेंनी शेतकऱ्याला अर्धीच रक्कम दिली. नंतर पैसे दिलेच नाहीत. त्याचा जाब विचारण्यासाठी जेव्हा हा शेतकरी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला आणि त्यांना जाब विचारला तेव्हा, भोसले यांनी त्या शेतकऱ्यावर बंदूक ताणली. तिथे उपस्थित असलेल्यांनी भोसले यांना आवरलं म्हणून मोठा अनर्थ टळला. दरम्यान, प्रभाकर भोसलेंविरोधात संबंधित शेतकऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.