breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

वसईमध्ये प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या, व्हिडीओ व्हायरल

Vasai Murder Case | मुंबईतील वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा प्रियकराने तरूणीच्या डोक्यात पान्ह्याने हल्ला करत तिला संपवलं. वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता. त्याला वालीव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (२९) आणि आरती यादव (२२) या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरती अन्य मुलांशी बोलत असल्याचा रोहित याला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत होती. त्यामुळे रोहित संतप्त झाला होता. आरती वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र गावराई पाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितने तिला अडवले. दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहित ने आपल्या सोबत आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले.

हेही वाचा       –      पिंपरी-चिंचवडमधील हातगाडी, फेरीवाल्यांसाठी ‘हॉकर्स झोन’ द्या!

https://x.com/thepawanupdates/status/1803009065041437046

आरती खाली कोसळली. काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर वार केले त्यात ती गतप्राण झाली. हत्येनंतर आरोपी रोहित तिथेच बसून राहिला वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी रोहितला ताब्यात घेतले. मयत आरतीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून एक महिन्यापूर्वीच ती कंपनीत कामाला लागली होती. ही हत्या होत असताना लोक व्हिडीओ काढत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button