breaking-newsTOP Newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सवादरम्यान ‘या’ शुभ गोष्टी घरी आणा, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही

Ganesh Utsav 2023 : गणेशोत्सवादरम्यान या वस्तू घरी आणल्याने कधीही धनाची कमतरता भासत नाही आणि बाप्पाही प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात, असा समज आहे. जाणून घेऊया या गोष्टींबद्दल..

एकमुखी नारळ : अशी धारणा आहे की, गणेशोत्सवादरम्यान घरात एकमुखी नारळ आणावा, ते खूप शुभ मानले जाते. पूजेमध्ये एकमुखी नारळ अर्पण करा आणि नंतर पूजास्थानी किंवा तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की, या नारळात धन आकर्षित करण्याची अद्भुत शक्ती आहे.

हेही वाचा – रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’? बॅनरमुळे जोरदार चर्चा!

शंख : हिंदू धर्मात शंखामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. गणेशोत्सवाच्या विशेष प्रसंगी शंख घरी आणल्याने आर्थिक प्रगती होते आणि वास्तुदोषही दूर होतात. त्यामुळे या दिवसात शंख आणून गणपतीची पूजा आणि आरती झाल्यानंतर दररोज शंख वाजवावा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रसार वाढेल.

कुबेर देवता : भगवान कुबेर हे संपत्तीचे देवता मानले जातात. कुबेर देवाची मूर्ती घरात ठेवल्याने गणेश आणि देवी लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि घरातील दारिद्र्यही दूर होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button