Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Breaking: मराठा संघटना आक्रमक होण्याच्या तयारीत, पोलिसांनी बजावली नोटीस

नाशिक: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव नाराज झालेले आहेत. त्यामुळे मराठा संघटनांनी आता आक्रमक पावित्रा घेतलेला आहे. त्यात नाशिक पोलिसांनी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावलेली आहे. 149 कलमाखाली ही नोटीस बजावण्यात आलेली आहे.

मराठा आरक्षण संदर्भात आंदोलनाची भूमिका घेतल्यानं खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मराठा संघटना आणखी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button