ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘संपूर्ण देशातील १२३ कोटी लोकांचा रक्तगट…’; संभाजी भिडे यांचे वक्तव्य

सांगली  |  ‘देश उभारण्याची ताकत मिळायची असेल, तर तर हिंदुस्थानाच्या १२३ कोटी लोकांचा रक्तगट हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा केला पाहिजे’,असे विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक सभाजी भिडेयांनी केले आहे. देशाला म्लेंच्छ,अँग्लो आणि गांधीबाधा झाली आहे,असे वक्तव्य करत भिडे यांनी काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला. मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

मिरजमध्ये शहरातल्या शिवाजी चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक आणि पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक २६ एप्रिल रोजी पार पडला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.यावेळी बोलताना संभाजी भिडे गुरुजी यांनी देशातील जनतेचे रक्त गट बदलण्याचे विधान केले पाहिजे.

संभाजी भिडे गुरुजी म्हणाले की, ‘व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. खाण्या पिण्यातून विषबाधा होते. पण या समस्यांवर उपाय करता येतो. मात्र आपल्या देशाला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच्छ बाधा, दुसरी अंग्लो बाधा आणि आणि तिसरी गांधी बाधा. या तिन्ही बाधांवरील जर तोडगा कोणता असेल तर तो म्हणजे शिवछत्रपती आणि संभाजी महाराज. त्यांची त्याची उपासना आपण केली पाहिजे. उपासना याचा अर्थ त्यांना प्रिय असलेले कार्य पूर्ण करण्यासाठी दैनंदिन जिवनात प्रयत्न केला पाहिजे.’

भिडे पुढे म्हणाले की, आपला देश हा जगाचा दाता आहे. या देशाची उभारणी करण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे कन्याकुमारी ते काश्मीर अशा संपूर्ण देशातील जनतेचा रक्तगट हा छत्रपती शिवाजी महाराज- संभाजी महाराज असा केला पाहिजे. मायभूमीच्या कपाळावरील हिंदुत्वाच्या स्वातंत्र्याचे कुंकू टिकवणारा आणि जगाचा संसार चालवणारा देश घडवायचा असेल तर हे फक्त छत्रपची शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे विचारच करू शकतात,असे मतही संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button