Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
राज्यसभेवेळी उणिवा राहिल्यानं भाजपचं फावलं, निकालानंतर परिषदेचा कोटा किती आहे कळेलच : भास्कर जाधव

मुंबई : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मतदान प्रक्रिया संपत आल्याचं म्हटलं आहे. शिवसेना गटा गटानं मतदान करत आहे ही गोष्ट खरी आहे. गेल्या वेळी काही उणिवा राहिल्या त्यामुळं भाजपचं फावलं आणि त्यांचा निवडून न येणारा उमेदवार निवडून आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहेत. विधानपरिषदेसाठी मतदानाचा कोटा सांगण्यापेक्षा चार तास राहिले आहेत. मतमोजणीत मतांचा कोटा किती आहे ते कळेल,असं भास्कर जाधव म्हणाले.
- भास्कर जाधव काय म्हणाले?





