पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप ‘या’ माजी मंत्र्याला देणारा तिकीट ?
![BJP 'Ya' ticket to former minister in Pandharpur by-election?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/download-4.jpg)
पंढरपूर – पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन झाल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात तारीख देखील जाहीर केली आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप भाजप आणि राष्ट्रवादीकडून उमेदवार ठरलेला नाही. दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांची नावे उमेदवार म्हणून समोर येत आहे.
एकीकडे राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच, आता भाजपकडून देखील अनपेक्षित उमेदवाराला उभे केले जाऊ शकते. भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याची चर्चा आता मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी राम शिंदेंचा पराभव केला होता. मात्र आता पुन्हा एकदा भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा रंगली आहे. याशिवाय भाजपकडून विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या देखील चर्चा आहे.
तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पोटनिवडणुकीत पार्थ पवार यांना संधी दिली जाण्याची चर्चा आहे. याशिवाय भारत भालके यांच्या जागी त्यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा मुलगा भगिरथ भालके यांनी उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोलले जात आहे.