ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कुडबुडे ज्योतिषी’, सचिन सावंतांची खोचक टीका

कोल्हापूर | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  हे कुडबुडे ज्योतिषी आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत  यांनी नाव न घेता केली. कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

कुडबुड्या ज्योतिषाला कोल्हापूरच्या सीमेबाहेर घालवले त्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचे अभिनंदन करतो, असं सचिन सावंत म्हणाले. सरकार पडणार असे ते दरवेळी सांगतात. सरकार पडण्याच्या तारखा देतात. ७२ तासांत मंत्री होणार असे सांगतात. अजूनही एक तारीख सत्यात उतरली नाही. त्यांच्यावर टीका केली तर ते धमकी देतात. संजय राऊत यांना धमकी देतात. आता तर ते ‘ईडी’ पाठवतो अशा धमक्या कोल्हापूरच्या जनतेलाही देत आहेत. भाजपच्या धमक्यांमुळे ‘ईडी’ हा जोक झाला आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

जो जो बोलेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडी, सीबीआयच्या कारवाया निवडणुकीच्या काळातच होतात. भाजपच्या लोकांना काय फेअर अॅन्ड लव्हली लावले आहे का?, त्यांचे चेहरे गोरे झाले आहेत. जे विरोधक आहेत त्यांच्यावर कारवाया करायच्या आणि ते पक्षात आले की त्यांचे चेहरे गोरे करायचे. देवेंद्र फडवणीस आणि चंद्रकांत पाटील यांनी आजूबाजूला पहावे आणि मग सांगावे. सगळे भ्रष्टाचारी त्यांच्याकडे आहेत, असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील बघतील म्हणून कोल्हापूरातील जनतेला पासबुक लपवावे लागेल, अशा शब्दात सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाची खिल्ली उडवली. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत मतदारांना पेटीएमद्वारे पैस दिले जात असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होती. त्या आरोपाला सचिन सावंत यांनी उत्तर दिलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले…

मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करून त्या खात्यांमध्ये पैसे पाठविण्याच्या प्रकाराची ईडीकडून चौकशी होऊ शकते, असा इशारा वेळीच दिला. आपण नागरिकांना घाबरवण्याऐवजी त्यांना सावध केले. यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी आपल्याला दुवा दिला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. कोल्हापुरात मंगळवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button