Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

भास्कर जाधव यांच्या अडचणीत वाढ, कुडाळ पोलिसांनी बजावली नोटीस

कुडाळ । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अवमानास्पद, शिवराळ आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भास्कर जाधव यांना नोटीस बजावण्यात आला आहे. कुडाळ पोलिसांनी नोटीस बजावली असून भाजपा कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली होती.

कुडाळच्या मोर्चामध्ये भास्कर जाधव यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात भास्कर जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

दरम्यान, भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीसह लक्ष्मी आणि गणपतीचाही फोटो लावा अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यानंतर अनेक नेत्यांनी भारतीय चलनी नोटांवर कोणाचा फोटो लावू शकतो यावर आपआपली मते मांडली आहेत. त्यातच, एका २५ पैशांच्या नाण्यावर भाजपा नेते नारायण राणे यांचा फोटो लावल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसंच, हे फायनल करा अशी मागणीही या मीमद्वारे करण्यात आली होती. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते भास्कर जाधव यांनीही हे नाणे एडिट करणाऱ्याचं कौतुक केलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button