देशासाठी भगतसिंगांचे मोलाचे योगदान ः सतीश काळे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/bhagatsingh-uttar-pradesh-750x470.jpeg)
- शहिद भगतसिंगांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन
पिंपरी-चिंचवड । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
परकियांच्या हातात देश असताना त्यामधून मुक्तता मिळविण्यासाठी अनेक शुर विर, योद्धे लढले. अनेकांनी आपले बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तरूण वयात शहीद भगतसिंग यांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे, प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी केले.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहीद भगतसिंगांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष ज्ञानदेव लोभे यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी शहराध्यक्ष सतिश काळे, सचिव संजय जाधव, उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदीप पवार, उमेश पाटील, गणेश जाधव आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी काळे बोलत होते.
सतिश काळे म्हणाले की, शहीद भगतसिंग यांच्या समोर मरण असताना देखील त्यांनी तुरूंगात वाचण्यासाठी पुस्तकाची केली. त्या मागणीसाठी उपोषण करणारे व भारतीय स्वातंत्र्यासाठी हसत फासावर जाणारे देशप्रेमी होते. त्यांचा लढण्याचा आदर्श घेण्यासारखा आहे. आज देखील देशामध्ये चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालण्याचे काम काही जण करतात. जातीभेद, धर्मभेदाच्या नावाखाली दंगली भडकविल्या जातात. मात्र हा देश विविध जाती-धर्मांनी एकसंध आहे. देशात एकता टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांनी शहिद भगतसिंगांसारखे लढवय्ये झाले पाहिजे, असे प्रतिपादन काळे यांनी केले.