सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना ‘पद्मश्री’ प्रदान
![Awarding 'Padma Shri' to social activist Girish Prabhune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-09T205034.447-1.jpg)
सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आज (दि.09) वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 10 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम शाळेचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आला.भटके विमुक्त समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देऊन कार्य करीत असलेले गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री किताबाने गौरवून केंद्र सरकारने एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचा उचित सन्मान केला आहे. पारधी जमातीसहित भटके विमुक्त समाजाला आत्मभान मिळवून देण्यात प्रभुणे यांचा मोठा वाटा आहे. पिंपरी-चिंचवड येथे ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ची स्थापना केली आणि पारधीसह अन्य भटके समाजाच्या चारशेहून अधिक मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय केली.
सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 10 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच दीड हजार अनाथ मुलांना आईचे प्रेम देणा-या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वर्ष 2020 मध्ये विविध क्षेत्रातील 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 16 मान्यवरांना पद्म भूषण आणि 118 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील 13 मान्यवरांचा समावेश आहे.