पुणेमहाराष्ट्र

किराणा दुकानात भरदिवसा सशस्त्र दरोडा

पिंपरी | सराईत गुन्हेगारासह चौघांनी मिळून आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड येथील एका किराणा दुकानावर सशस्त्र दरोडा टाकला. ही घटना 8 जून रोजी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास घडली असून याबाबत 22 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज उर्फ सशा वाघमारे, स्वप्न्या उर्फ स्वप्निल माडेकर, राजा माडेकर, साहिल मेहंदळे (सर्व रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आनंदनगर झोपडपट्टी येथे माताजी सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. आठ जून रोजी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास आरोपी लोखंडी कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन फिर्यादी यांच्या दुकानात आले. आम्हाला दारू प्यायला दोनशे रुपये दे, असे म्हणून पैसे न दिल्याच्या रागातून दुकानाच्या काउंटरवर कोयत्याने मारून नुकसान केले.

तसेच गल्यातील पैसे जबरदस्तीने चोरून घेतले. फिर्यादी आणि त्यांच्या पतीने आरोपींना विरोध केला असता आरोपींनी हत्याराचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्या मदतीला आलेल्या आजूबाजूच्या लोकांना आरोपींनी हत्याराचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button