‘शिरूर लोकसभेचा खरा नायक शिवाजी आढळराव पाटील, त्यांनाच निवडून द्या’; अपुर्व पाटलांचं आवाहन
![Apurv Patil said that the real hero of Shirur Lok Sabha is Shivaji Adharao Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Shivajirao-Adhalrao-Patil-780x470.jpg)
पुणे | शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सामना होणार आहे. अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शरद पवार गटातील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दोन्हीही उमेदवारांनी आपला प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. अशातच आढळराव पाटलांचे सुपुत्र अपुर्व पाटलांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे.
रमजान ईदच्या निमित्ताने शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचे चिरंजीव अपूर्व आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघात मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना अपूर्व पाटील यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, शिरूर लोकसभेचा खरा नायक म्हणजेच शिवाजी आढळराव पाटील यांना निवडून द्यावे.
हेही वाचा – सोन्याच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे सोन्याचा दर
शिरूर लोकसभेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही, असे अपूर्व शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे उपनेते इरफान भाई सय्यद तसेच भारतीय जनता पार्टीचे पुणे उपाध्यक्ष किसन बावकर, युवासेना संपर्कप्रमुख संकेत चावरे व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक उत्तम केंदळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.