breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक

पुणे : गेल्या आठवड्यात मुंबई-पुणे महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेचा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दरड हटवण्याच्या कामासाठी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर आज (गुरूवारी) पुन्हा दोन तासांसाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सध्या लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी सैल झाल्या आहेत. या सैल झालेल्या दरडी हटवल्या जाणार आहेत, यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. मुंबईवरून पुण्याकडे येणारी वाहतुक मात्र सुरूच राहणार आहे.

हेही वाचा – मुंबईसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ जारी

पुणे-मुंबई महामार्गावर आज दोन तास ब्लॉक असल्याने बलकी वाहतुक मॅजिक पॉईंटपासून जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वळवली जाणार आहे. परंतु जड वाहतुकीला या मार्गावर बंदी आहे. यामुळे जड वाहतूक जिथे आहे तिथेच थांबवली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button