एसटीच्या २०० कर्मचाऱ्यांची आणखी एक समस्या, आंदोलन करूनही तोडगा नाही
![Another problem of 200 employees of ST is not solved even by agitation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Another-problem-of-200-employees-of-ST-is-not-solved-even-by-agitation.png)
औरंगाबाद | एसटीच्या हून २०० अधिक कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) व निवृत्तीवेतन बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्रुटी पूर्ण केल्यानंतरही त्यांचे पैसे मिळाले नाहीत. महामंडळात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची सेवा गेल्या दोन वर्षांत संपली. त्यांना लॉकडाउनच्या काळात निवृत्तीनंतर त्यांना महामंडळाकडून त्यांचे एकूण पैसे मिळालेले आहेत. मात्र, ‘पीएफ’ कार्यालयाकडून अशा काही कर्मचाऱ्यांचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. शिवाय अनेक कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली पेन्शनही अजूनही सुरू झालेली नाही.
या विरोधात इपीएस ९५ संघटनेकडून पीएफ कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन एसटी विभागाकडून पीएफ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात आलेल्या आहेत. यानंतरही अनेक जणांचे पीएफ किंवा पेन्शन अजूनही निघालेले नाहीत. ‘पीएफ’ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून दिलेल्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांनी नावातील झालेल्या चुका दुरूस्त केलेल्या आहेत. यानंतरही ‘पीएफ’ कार्यालयातून या कर्मचाऱ्यांच्या समस्या बाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
अशी आहे समस्या
अनेक कर्मचाऱ्यांना एसटी विभागाकडून मिळणारा निधी मिळालेला आहे. हा निधी घर तयार करणे, व्यवसाय टाकणे, मुलांचे लग्न किंवा अन्य अडचणीच्या काळात खर्च झालेले आहे. दोन ते अडीच हजार रूपयांची मिळणारी पेन्शन बंद असल्याने अनेक जणांना आपल्या छोट्या गरजाही पूर्ण करता येत नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण पडत आहे.