breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

नामांकित कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने केल्या २१ दुचाकी चोरी

पोलिसांनी चोरट्यांकडुन 6 लाख रुपयांच्या मोटारसायकल केल्या जप्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा दोन पथकाने अटक केली आहे.

नामांकित कंपनीत हेल्पर म्हणून काम करणाऱ्या कामगाराने त्याच कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून पोलिसांनी जवळपास सहा लाख रुपये किमतीच्या २१ दुचाकी वाहन जप्त केले आहेत. प्रदीप आश्रुबा गायकवाड आणि इरफान मेहबूब शेख अशी दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत.

यापैकी प्रदीप आश्रुबा गायकवाड हा मुळचा बीड जिल्ह्याचा रहिवासी असून तो पिंपरी चिंचवड शहरातील टाटा मोटर्समध्ये कामाला होता. मात्र त्याला दारूचे मोठ्या प्रमाणात व्यसन असल्यामुळे, त्याने टाटा मोटर्स मध्ये कामाला असताना देखील दुचाकी वाहन चोरी करण्यास सुरुवात केली. दुचाकी वाहन चोरी केल्यानंतर तो बीड जिल्ह्यातील आपला मित्र इरफान मेहबूब शेख याला दुचाकी वाहन विकत असे. या दोन्ही गुन्हेगारांकडून पोलिसांनी २१ दुचाकी वाहन जप्त केली आहे तर आकाश अनिल घोडके या दुचाकी चोराकडून पोलिसांनी ४ दुचाकी वाहन आणि एक महागडी सायकल जप्त केली आहेत. ज्या वाहनांना हँडल लॉक लागलेला नसेल, अशा वाहनांना बनावट चावी द्वारे प्रदीप गायकवाड हा चोरी करत असल्यास पोलीस तपासात निष्पन्न झाल आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button