अमरावती जिल्हा बँक निवडणूक : यशोमती ठाकुरांना धक्का, बच्चू कडू विजयी
![Amravati District Bank Election: Push to Yashomati Thakur, Bachchu Kadu wins](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/yasho.jpg)
अमरावती – अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यशोमती ठाकुरांना धक्का दिला आहे. बच्चू कडू यांनी यशोमती ठाकुरांचे पॅनल असलेल्या माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव करित बँकेत एन्ट्री केली आहे. चांदुर रेल्वे सेवा सहकारी सोसायटीमधून माजी आमदार वीरेंद्र जगताप विजयी झाले.
अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल असून जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांसह अन्य राजकीय आणि सहकारातील दिग्गजांचा त्या पॅनलमध्ये प्रत्यक्ष उमेदवार म्हणून सहभाग होता. तर त्यांच्याविरुद्ध राज्यमंत्री बच्चू कडू, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनल आहे. परिवर्तन पॅनलमध्ये राज्यमंत्री बच्चू कडू स्वत: उमेदवार होते. त्यांच्यासोबत संजय खोडके, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह सहकारातील दिग्गज मंडळींनी रणांगणात उतरली होती. तर भाजप आमदार प्रताप अडसड, माजी मंत्री भैय्यासाहेब देशमुख सारखे दिगग्जांनी पॅनलचं काम पाहिलं. मंत्र्याच्या आणि आमदारांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक हायव्होल्टेज झाली आहे. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून सध्या मतमोजणी सुरू असून परिवर्तन विरुद्ध सहकार पॅनल मध्ये चुरशीची लढत सुरू आहे.
आमदार प्रकाश भारसाकळे पराभूत –
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यशोमती ठाकुरांना धक्का दिला आहे. बच्चू कडू यांनी यशोमती ठाकुरांच्या सहकार पॅनलमधील माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव करित बँकेत एन्ट्री केली आहे. चांदुर रेल्वे सेवा सहकारी सोसायटीमधून माजी आमदार वीरेंद्र जगताप विजयी झाले. तर दर्यापूर सेवासहकारी सोसायटी मधून आमदार प्रकाश पाटील भारसाकळे पराभूत.