Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

“पुरुषांनी सोन्याच्या जाडजूड साखळ्या घालू नयेत, बैलासारखे दिसतात”; अजित पवारांचा टोला

पुणे | सोन्याचे दागिने घालणे हे स्त्रियांनाच शोभून दिसते, पुरुषांनी अशा भानगडीत पडू नये, असे परखड मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. आज (सोमवार) चाकण येथील रांका ज्वेलर्सच्या दालनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी पुरुषांनी गळ्यात जाडजूड सोन्याच्या साखळ्या घालण्यावरून ‘गोल्डनमॅन’ म्हणून मिरवणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना खरमरीत कानपिचक्या दिल्या.

अजित पवार म्हणाले, की लहानातल्या लहान माणसांपासून अनेक लोकांना सोनं आणि सोन्याचे दागिने वापरणं आवडतं. एकंदरीतच लोकांचं राहणीमान बदलतं आहे. पर्चेसिंग पावर वाढली आहे. त्यामुळे अनेकजण सोन्याच्या ज्वेलर्समध्ये जाऊन चांगलं सोनं खरेदी करतात. एखादा प्रसंग आलाच तर सोनं गहाणही ठेवता येतं. वेळेला त्याचे पैसेही करता येतात. आपल्याकडे गोल्डन मॅन म्हणूनही काहींची ओळख आहे. कुणीतरी तर सोन्याचे कपडेही शिवले होते हे आपण पाहिलं. पण ते सगळं अति होतं. मला या सगळ्यांना सांगायचं आहे की सोनं हे आपल्या आईच्या, पत्नीच्या, लाडक्या बहिणीच्या किंवा मुलीच्या अंगावर शोभून दिसतं. पुरुषांच्या अंगावर एवढं सोनं काही शोभून दिसत नाही त्यामुळे उगीचच त्या भानगडीत पडू नका. आपण त्या बैलाला साखळी घालतो तशा साखळ्या घालतात आणि येतात समोर. जे कुणी अशा साखळ्या घालतात ते त्यांच्या पैशांनी घालतात. मला काही त्यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही पण ते सोनं त्यांनी त्यांच्या घरातल्या स्त्रियांना दिलं तर जास्त चांगलं होईल.

हेही वाचा     :        नदीचे पात्र कमी केल्यामुळेच पूर परिस्थिती; उपमुख्यमंत्री अजित पवार 

सर्व मंत्र्यांनी दौरे केलेत. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होतं, शेतीचं प्रचंड नुकसान होतं, जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. पण आम्ही या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्या अनुषंगाने निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना झालेल्या नुकसानीची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी केलेली आहे. यासाठी विविध विभागांची मदत लागणार आहे. सरकार याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेईल, असं अजित पवार म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button