breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१६ वर्षांच्या भारतीय विद्यार्थिनीने उभारली कोट्यावधींची ‘AI’ कंपनी

Delv AI Company : सध्या सगळीकडे AI ची चर्चा सुरू आहे. दरम्यान, एका १६ वर्षांच्या भारतीय विद्यार्थिनीने कोट्यवधींची AI कंपनी उभारून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. प्रांजली अवस्थी असं या मुलीचे नाव आहे. तिने Delv.AI नावाची एक स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे.

या कंपनीमध्ये १० लोक काम करतात आणि याचं मार्केट इव्हॅल्यूशन तब्बल १२ मिलियन डॉलर्सहून अधिक आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तिने ही कंपनी सुरू केली होती आणि आतापर्यंत तिला ३.७ कोटी रूपयांची फंडिंग मिळाली आहे.

हेही वाचा – ‘नक्षलवाद्यांच्या हस्ते शिंदेंचा एन्काऊंटर करण्याचा प्लॅन होता’; शिंदे गटातील नेत्याचा गंभीर आरोप 

प्रांजलीने मियामी टेक वीक या कार्यक्रमात आपल्या कंपनीची माहिती दिली. 2022 च्या जानेवारी महिन्यात तिने ही कंपनी सुरू केली होती. आतापर्यंत आपल्याला मिळालेल्या यशाचं श्रेय तिने आपल्या वडिलांना दिलं. त्यांच्यामुळेच आपल्याला विज्ञान आणि टेक विषयात गोडी निर्माण झाल्याचं तिने सांगितलं.

काय आहे कंपनी?

Delv.AI ही कंपनी उपलब्ध ऑनलाईन कंटेंटपैकी रिसर्चर्सना विशिष्ट माहिती अगदी कौशल्यपूर्ण पद्धतीने मिळवून देण्यासाठी काम करते. हेच या कंपनीचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं प्रांजलने स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button