breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही विकेंड लॉकडाऊन, पर्यटनावर बंदी

नाशिक – पुण्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आता नाशिकमध्येही विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तसेच, शनिवार-रविवारी पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात येणार अशल्याची घोषणा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. तर, सोमवारपासून जिल्ह्यातील मॉल्स सुरू करण्यात येणार आहेत.

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पाऊस सुरू झाल्याने नाशिकमध्ये पर्यटनस्थळावर गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. परिणामी शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यटनस्थळांवरील गर्दी टाळण्यासाठी या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच कालसर्प आणि नारायण नागबळीबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भुजबळ यांनी यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या तर शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

नाशिकचा मृत्यूदर 1.74 टक्के आहे. मृत्यू संख्या लपवणे हा उद्देश नाही. खासगी रुग्णालयातील माहिती अपूर्ण आहे. ही टेक्निकल चूक असून दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. तर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 4.74 टक्के आहे. जिल्ह्यात 9 टक्के बेड फुल आहेत. जिल्ह्याला 400 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. आपल्याकडे सध्या 155 मॅट्रिक टन ऑक्सिजन आहे, असं त्यांनी सांगितलं. नाशिकमध्ये अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाणार आहे. तसेच त्र्यंबकेश्वर धार्मिक विधी सुरू करण्याचा निर्णय राज्यस्तरावर होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button