क्रिडाताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र
अॅड. अजित अर्जुन चौगुले यांना महाराष्ट्र रत्न २०२३ पुरस्कार.
पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
![अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व तृप्ती देसाई यांच्या हस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्कार स्वीकारताना ॲड. अजित चौगुले, आई अंजली चौगुले, वडील अर्जुन चौगुले.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Ajit-Chaugule-780x470.jpg)
पुणे : हडपसर येथील अॅड. अजित अर्जुन चौगुले यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न २०२३ हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. टाइम्स ऑफ पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आला.
यावेळी ॲड. अजित चौगुले, आई अंजली चौगुले, वडील अर्जुन चौगुले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी टाइम्स ऑफ पुणे या संस्थेचे आदम अली सय्यद, सतिश राठोड, स्नेहा कुलकर्णी आदी उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.