breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

FB वरुन ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

अलिबाग |

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्ष सक्त मजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयाने सुनावली आहे. परेश मते असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे. सदरचा गुन्हा दिनांक ११ मार्च २०२१ रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास घडल्याचा उल्लेख या प्रकरणातील कागदपत्रांमध्ये आहे. याप्रकरणातील पिडीतेशी आरोपी परेश मते याने फेसबुवर मैत्री केली. सुरवातीला जवळीक साधून त्यानंतर फोनवरून संवाद साधून आरोपीने पिडीतेला तिच्या अज्ञानाचा व एकटेपणाचा फायदा घेतला. आरोपीन या मुलीला तिच्या मर्जीशिवाय तसेच तिच्या आईवडिलांच्या कायदेशीर राखावालीतून आपटा फाटा येथे पळवून नेले.

तिथेच आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भा.द.वि कलम ३६३, ३५४, ३७६(२) (१) (एन) तसेच पोक्सो कायदा कलम, २०१२ नुसार कलम ३,४,५ (ल),७,८,९ ,(ल),१०, ११,१२,व १५ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयात झाली. विशेष सत्र न्यायाधीश शाईदा शेख यांनी दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेतले. सरकारी अभियोक्ता म्हणून यावेळी भुषण साळवी यांनी काम पाहीले. सुनावणी दरम्यान एकुण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पिडीत मुलगी, तिचे वडील, वैद्यकीय अधिकारी, तपासिक अमंलदार यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपी परेश मते याला पोक्सो कलम २०१२ नुसार कलम ३ व ४ (२) प्रमाणे दोषी ठरविले, आणि २० वर्षाची शिक्षा तसेच ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button