breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

Tulja Bhavani Mandir : आई तुळजाभवानीच्या अभिषेक पूजेची दरवाढ रद्द

तुळजापूर : महाराष्ट्रातील शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवी तुळजाभवानीच्या अभिषेक पूजेची दरवाढ रद्द करण्यात आली आहे. ५० रुपयां ऐवजी ५०० रुपये एवढी दरवाढ केली होती. मात्र पुजारी आणि भाविकांच्या विरोधानंतर ही दर वाढ रद्द करण्यात आली आहे. सोबतच व्हिआयपी दर्शन देखील सुरू असणार आहे.

आई तुळजाभवानीच्या अभिषेकासाठी ५० रुपयां ऐवजी ५०० रुपये शुल्क आकारले जावे असा निर्णय तुळजाभवानी मंदिर समितीने घेतला होता. हा निर्णय सोमवार पासून आमलात अणला जाणार होता. मात्र या निर्णयाला पुजाऱ्यांनी विरोध दर्शवला. पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने निर्णय रद्द करावा यासाठी जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे मागणी केली होती. यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची ‘ती’ गोष्ट खुपते; नितीन गडकरी

दरम्यान, आई तुळजाभवानीच्या अभिषेकासाठी आता ५० रुपयां ऐवजी ५०० रुपये शुल्क आकारले जावे. तसेच व्हीआयपी दर्शनसाठीही आता २०० रुपयांचे शुल्क आकारले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button