Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांगलीत योगदिनी विक्रमी साडेपाच लाख साधकांचा सहभाग

सांगली : सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जागतिक योग दिनाचे औचित्य साधून वारकरी संगीताच्या तालावर भक्तियोग करत विश्वविक्रम नोंदवण्यात आला. जिल्ह्याच्या विविध भागांतून सुमारे साडेपाच लाख लोक या योगसाधनेत सहभागी झाले होते. या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली.

भक्तियोग – ताल वारकरी योगकरी आरोग्य पंढरी हा कार्यक्रम जागतिक योगदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. चितळे उद्योग समूह व गिरीष चितळे, विड योग केंद्र, वारकरी संप्रदाय यांच्यासह या योग साधनेमध्ये सहभाग महत्त्वाचा होता. यावेळी ग्रामीण विकासमंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा –  गायत्री स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा

सांगली जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांतील पोर्टलवर नोंदणीकृत १ हजार ३६७ केंद्रे व अनोंदणीकृत अन्य केंद्रे अशा १६०० हून अधिक केंद्रांवरील जवळपास साडेपाच लाखांहून अधिक योगसाधक, योगप्रेमी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक, युवक, महिला, शाळा महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी वेबिनारद्वारे मुख्य केंद्राशी जोडले जात विश्वविक्रमास गवसणी घातली. ग्रामविकास व पंचायत राजमंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना वर्ल्ड रेकॉर्डस बुक, आशिया बुक व इंडिया बुकमध्ये झालेल्या रेकॉर्डबद्दल प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button