अवघ्या ८ वर्षाच्या गृहिताने सर केले अवघड ‘माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Mount-Everst-780x470.jpeg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा जगातील सर्वात उंच, कठीणात कठीण ट्रेक २८ ऑक्टोबर २०२२ रोजी गृहिता विचारे या छोट्या हिरकणीने यशस्वीरीत्या सर केला. माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठताना आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी जी आव्हाने तिच्यासमोर होती ती म्हणजे, सरळ चढ असलेली शिखरं सर करणे, उणे अंश तापमानाशी झुंझ अर्थात शून्य अंश सेल्सिअस, थंडगार वारा, गोठलेले पाणी, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी, कुठेही शेवट न दिसणारी अशी अंतहीन चढाई आणि आव्हानात्मक हवामानातील बदलांना तोंड द्यावे लागले. अशावेळी भल्याभल्यांना देखील घाम फुटतो, पण गृहिताकडे ती जिद्द होती. काहीही झालं तरी ते उंच टोक गाठायचं म्हणजे गाठायचच! अशी जिद्द उराशी बाळगून आपले वडील सचिन गंगाधर विचारेसह ती उंची तिने गाठली!
आजवर १०वर्षाच्या मुलीने ही उंची गाठण्याचा विक्रम केला होता! तिच्यापे प्रस्थारित क्षा दोन वर्षाने लहान गृहिताने हा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम केला आहे!१३ दिवसांचा हा ट्रेक, जो काठमांडूपासून (समुद्र सपाटीपासून १४०० मीटर उंच) रामेछाप विमानतळापर्यंत ४ तासांचा आहे. रामेछाप ते लुक्ला विमानाने प्रवास (समुद्र सपाटीपासून २८४३मीटर उंचीवर) वास्तविक हा ट्रेक १४८ किमीचा आहे आणि लुक्ला (समुद्र सपाटीपासून २८४३ मीटर उंच) ते फाकडिंग (२६१० मीटर उंच) ते नामचे Namche बाजार (३४४० मीटर) ते टिंगबोचे (३८६० मीटर) ते डिंगबोचे Dingboche (४४१० मीटर) ते लोबुचे Lobuche(४९१० मीटर) ते गोरक्षेप Gorakshep (५१४० मीटर) ते कालापथर Kalapathar (५५५० मीटर) आणि अखेरीस मानाचा रुरा म्हणजेच एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर).
आता गृहिताचे वडील आपल्या लेकीसह लुक्लाकडे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत जो सोमवारपर्यंत पूर्ण होणार असून ३ नोव्हेबरला गृहिता मुंबईत येणार आहे.