World Cup 2023 : आज पुण्यात निघणार ‘वर्ल्ड कप ट्रॉफी’ची भव्य मिरवणूक
![A grand procession of the World Cup trophy will be held in Pune today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/world-cup-trophy-2023-780x470.jpg)
पुणे : पुण्यात २७ वर्षांनंतर क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात वर्ल्ड कप ट्रॉफीचं आगमन होणार असून ट्रॉफीची भव्य मिरवणूक निघणार आहे. पुणेकरांना ही ट्रॉफी अगदी जवळून पाहता येणार आहे.
वर्ल्ड कप ट्रॉफीची रॅली दुपारी १२ वाजता एस बी रोडवरील नामांकित मॅरेट या हॉटेलपासून ही रॅली सुरू होणार आहे. बीएमसी कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज रोड ते ॲग्रीकल्चर कॉलेज शिवाजीनगरपर्यंत असणार आहे. पुण्यात होणाऱ्या या रॅलीमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्त्व केलेले आजी-माजी खेळाडू सहभागी होणार आहेत.
हेही वाचा – ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अखेर घोषणा; कधी अन् कुठे रंगणार थरार?
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यामध्ये ५ तारखेपासून वर्ल्ड कप थराराला सुरूवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे. तर पुण्यामध्ये यंदा वर्ल्ड कप स्पर्धेमधील पहिला सामना १९ ऑक्टोबरला बांगलादेशसोबतचा पहिला सामना आहे.