breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुण्याचं दाम्पत्य २५ किलो सोनं घालून तिरुपती दर्शनाला! Video व्हायरल..

पुणे | पुण्यातील गोल्डन बॉय म्हणून ओळखले जाणारे सनी वाघचौरे आणि संजय गुजर एका व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आले. अंगावर तब्बल २५ किलो सोन्याचे दागिने घालून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सच्याही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

पीटीआयनं पोस्ट केलेल्या या व्हिडीओसह त्याबाबतची माहितीही देण्यात आली आहे. व्हिडीओतील पुणेकर कुटुंब तब्बल २५ किलो सोनं अंगावर घालून तिरुपती देवस्थानला दर्शनासाठी पोहोचल्याचं त्यात म्हटलं आहे. हा व्हिडीओ २३ ऑगस्ट रोजी पोस्ट झाला असून त्याच दिवशी हे कुटुंब दर्शनासाठी तिरुपती देवस्थानला गेल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा    –    एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार देणार का? राज ठाकरे म्हणाले.. 

या व्हिडीओमध्ये दोन पुरुष, एक महिला व एक लहान मूल दिसत आहेत. पुरुषांच्या गळ्यात आणि हातात सोन्याचे भरगच्च दागिने दिसत आहेत. त्याचवेळी त्यांच्यासह चालणाऱ्या महिलेच्या अंगावरही अनेक सोन्याचे दागिने आहेत. एका व्यक्तीच्या गळ्यात इंग्रजीत 7 क्रमांकाची साखळी असून दुसऱ्या व्यक्तीच्या गळ्यात ‘नाना’ असं लिहिलेली साखळी दिसत आहे. या सोन्याचं वजन जवळपास २५ किलो असून त्याची किंमत तब्बल १८ कोटींच्या घरात असल्याचंही सांगितलं जात आहे.

सनी वाघचौरे हे उद्योजक आणि चित्रपट निर्माते आहेत. संजय गुजर हे बांधकाम उद्योगात असून, चित्रपट निर्मितीतही अर्थ पुरवठा करतात. २५ किलो म्हणजे तब्बल १६ कोटी ८८ लाख १७ हजार ८७५ रुपयांचे सोन्याचे दागिने घालून देवदर्शन घेतल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button